नवी दिल्ली : अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाली आहे. दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्याने विदेशी बाजारपेठेतील सोन्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत बाजारावर देखील झाला आहे.दिल्लीच्या सराफा बाजारात दहा ग्रॅम सोन्याचे दर वाढून 418 रुपये झाले. चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विकसित अर्थव्यवस्थेच्या आर्थिक आकडेवारीत घसरण सुरु असल्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती आता मजबूत झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कमकुवत झालेल्या डॉलरमुळे सोन्याचे दर दोन हफ्त्यात उच्च पातळीवर गेले. विदेशी बाजारात सोने 1,968.98 (Gold Spot Price) डॉलर प्रति औंस वर गेले आहेत.मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 418 रुपयांची वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,545 रुपयांवरून 52,963 रुपयांवर गेला आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे. आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 2246 रुपयांनी वाढला. त्यानंतर तो 72,793 रुपयांवर गेला आहे.
जळगाव येथील धनलक्ष्मी ज्वेलर्स (9960390901) येथील आताचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
सोने 51200 चांदी 63500