रेल्वेतून पडलेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन

On: June 18, 2024 10:04 PM

जळगाव : नगरदेवळा रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या डाऊन लोहमार्गावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सदर महिला कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून खाली पडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. 

अंदाजे 60 वर्षे वय असलेल्या या वृद्ध महिलेचे डोके फुटून मृत्यू झाला आहे. या महिलेची उंची 170 सेंमी असून रंग गोरा आहे. या महिलेच्या उजव्या हातावर फुलाचे चित्र गोंदलेले असून नाक बसके आहे. या घटनेचा तपास चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रामराव इंगळे करत आहेत. या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशन चा फोन नंबर 02589223583 अथवा 9923168539 (रामराव इंगळे) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment