जळगाव विमानतळ अपघातात सुदैवाने प्राणहाणी नाही

जळगाव : जळगाव विमानतळाच्या धावपट्टीवर घसरत गेलेल्या विमानासह धावपट्टीचे नुकसान झाले असले तरी या घटनेत सुदैवाने कोणतीही प्राणहाणी झालेली नाही. प्रशिक्षणार्थी विमानाच्या पुढील बाजूचा लॅंडींग गिअर निखळल्याने ते  धावपट्टीवर घसरल्याची घटना बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली होती.

‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे हे प्रशिक्षणार्थी विमान होते. धावपट्टीवर उड्डाण घेत असताना या शिकाऊ विमानाच्या पुढील बाजूचा लॅंडिंग गिअर निखळून पडला होता. प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणा-या व्हीटी एलएवाय या विमानाच्या पुढील भागासह धावपट्टीचे नुकसान झाले. धावपट्टीला खड्डा पडून विमान वीस ते तीस फूट घसरत गेल्याने धावपट्टीचे नुकसान झाले.

घटना घडल्यानंतर लागलीच अपघातग्रस्त विमान बाजूला सारण्यात आले. त्यामुळे गोवा, हैदराबाद येथील विमानसेवेवर त्याचा परिणाम झाला नाही. मात्र या घटनेमुळे विमानतळावर सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली होती. विमानातील प्रशिक्षणार्थी पायलट व प्रशिक्षणार्थी सुखरुप असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here