सोलापूर : सोलापुरात काळविटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मांस विकत घेतल्याप्रकरणी दोघांवर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. दोघा मांस खरेदीदारांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वन अधिनियमानुसार शिकार करणे अथवा शिकारीचे मांस खरेदी करणे कायद्याने अपराध आहे.
शिकार केलेल्या काळविटाचे मांस खरेदी करणा-या मुतन्ना कोळी व विष्णू बनसोडे या दोघांना देखील अटक करत कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वन विभागाची ही पहिलीच कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी गावात तीन दिवसांपूर्वी विजय भोसले या शिकाऱ्यास वनविभागाने काळविटाच्या मांसासह रंगेहाथ अटक केली होती. यावेळी अटकेतील आरोपीच्या घरात काळविटचे मांस, चारही पायाचे खूर, काळवीटाची त्वचा, शिंगे, नायलॉन वायरचे फासे, कुऱ्हाड, सुरा, वागर, वजन काटा असे सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले होते.