आजचे राशी भविष्य (13/7/2024)
मेष : कामाचा ताण, अति महत्त्वाकांक्षा यामुळे काहीसे त्रस्त व्हाल. कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल.
वृषभ : उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस राहील. सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल
मिथुन : सगळ्याच गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. वैवाहिक जीवनात थोडी कुरबुर राहील.
कर्क : स्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदारास वेळ द्यावा.
सिंह : अति श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
कन्या : प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.
तूळ : कष्टांचा अतिरेक करु नका. गृहिणींसाठी व्यस्त दिवस.
वृश्चिक : घरदुरुस्तीच्या कामात लक्ष घालावे लागणार आहे. महत्वाचे निरोप मिळतील.
धनु : नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. विरोधक आज नमते घेतील.
कुंभ : उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल.
मीन : उच्च शिक्षितांना नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. प्रतिष्ठींतांच्या ओळखी कामात येतील.