जळगाव : वृक्ष देवता ही सर्वांची देवता आहे. आपल्या घरासमोर, कार्यालयासमोर, दुकानासमोर अथवा आपण ज्याठिकाणी नोकरी करत असाल तिथे आपणास आवडत असलेले, पूज्य असलेले झाड लावून म्हणजे वृक्ष देवतेची स्थापना करुन त्याचे संगोपन करावे असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.
सध्या आपल्या देशात जीवसृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनयुक्त फळ फुलांच्या वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. पर्यायांने तपमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आपण बेचैन होत आहोत. आपण आज धरती मातेचा प्रकोप होतांना बघत आहोत. अनेक ठिकाणी भूकंप, पुर, ढगफुटीच्या घटना होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व जिवांना आवश्यक असले असणारी ऑक्सिजनयुक्त, वर्षानुवर्ष टिकणारी झाडे, आयुर्वेदिक तसेच वेगवेगळ्या प्रकारची फळ फुलांच्या झाडांची संख्या कमी होत आहेत.