जळगाव : चोरीच्या सात मोटार सायकलींसह चोरट्यास नशिराबाद पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. शाहबाज शेख अब्दुल रहेमान असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. विविध पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे या तपासासह कारवाईतून उघडकीस आले आहेत. नागरिकांनी आपापल्या घराबाहेर तसेच परिसरत सीसीटिव्ही कॅमेरे लावून पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी या निमीत्ताने केले आहे.
नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुशंगाने सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या पथकातील अंमलदार पोहेकॉ युनुस शेख, पोहेकॉ. शिवदास चौधरी, पोहेकॉ राजेंद्र ठाकरे, पोकॉ. भरत बाविस्कर, पोकॉ. पंकज सोनवणे, पोकॉ. सागर विडे, पोकॉ. प्रविण लोहार, चापोना अजीत तडवी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित शाहबाज शेख अब्दुल रहेमान (रा. नशिराबाद) यांस चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
सखोल चौकशीअंती त्याने नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यासह रामानंद नगर, शनिपेठ पो.स्टे.तसेच इतर ठिकाणाहुन चोरलेल्या तिन मोटार सायकलींची कबुली दिली. चोरीच्या एकुण सात मोटार सायकली त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. राजेंद्र ठाकरे करत आहेत.