जळगाव : 15 जून पासून अमृत वृक्ष आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू झाला असल्याची माहिती पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेन्द्रसिंग पाटील यांनी दिली आहे. तसेच एक पेड मा के नाम या योजनेची पूर्तता व्हावी तसेच राज्याने अवलंबलेले वृक्ष लागवडीचे धोरण यापुढे सुरू ठेवावे असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होण्यासाठी वृक्ष लागवडीसाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांच्या मागणीनुसार उपलब्धेनुसार रोपे मिळणार आहेत. या योजनेचा फायदा घेतल्यास आपला परिसर हिरवागार, कमी तापमानाचा होऊन पर्यावरणास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या एक पेड माँ के नाम या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.