गावठी कट्टा बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई

On: July 12, 2024 5:46 PM

जळगाव : रात्रगस्ती दरम्यान चाळीसगाव बस स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या प्रवासी तरुणाकडून गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.  चाळीसगाव शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक बनावटी पिस्टल, दोन जिवंत काडतुस, एक मॅगझिन , दोन मोबाईल असा एकूण 51,450/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गणेश तुकाराम पवार (रा. मु.बोरमाळी पो.नागद ता. कन्न्ड जि. संभाजी नगर ह.मु. नानेकर वाडी चाकण ता. खेड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पो कॉ समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 297 / 2024 भारतीय हत्यार कायदा कलम 03, 25 , 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील गणेश पवार याच्या विरुद्ध आळंदी पोलिस स्टेशनला देखील भारतीय हत्यार कायदा 03, 25, 29 अन्वये गुन्हा दाखल आहे.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोउनि सुभाष पाटील, पोहेकॉ राहूल सोनवणे, पोहकॉ नितीश पाटील, पोना महेंद्र पाटील, पो.कॉ. समाधान पाटील, अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रविद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment