निरोगी आयुष्यासाठी वृक्षसंवर्धन करावे – सुरेंद्र सिंग पाटील

एकदाच वर्गणीरुपी खर्च करुन निरोगी आयुष्य जगण्यासाठी जमिनीला आवश्यक असलेले झाड लावून त्याचे संगोपन करावे असे पर्यावरण जागर प्रतिष्ठान समितीचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी म्हटले आहे. जमीनीचा समतोल बिघडण्यास मनुष्य कारणीभूत असून त्यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असल्याचे देखील सुरेंद्रसिंग पाटील यांनी म्हटले आहे.

मानवी जन्म हा भुतलावर होतो. मानवाचे संपुर्ण जीवन हे पर्यावरणावर अवलंबून असते. सद्यस्थितीत जमिनीचा समतोल बिघडल्यामुळे पर्यावरणावर प्रचंड प्रमाणात बदल झाला असून त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी ढगफुटी होत आहे. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. काही ठिकाणी पावसाच्या पाण्यात पशुधन वाहून जाते तसेच शेतीचे देखील नुकसान होते. अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसतात.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण ज्या पद्धतीने दरवर्षी होणाऱ्या धार्मिक सणासाठी आपण देणगी स्वरुपात मदत करत असतो. त्याऐवजी विविध ठिकाणी ऑक्सीजनयुक्त वृक्ष लागवड केल्यास ती पुढील कित्येक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आपण आपल्या पसंतीचे झाड लावलेले असल्याने ते तोडण्याची इच्छा आपल्याला कधी होणार नाही. आपण आपले वाहन लावण्यासाठी सावलीचा आधार घेतो. “झाडे लावा – झाडे जगवा” आणि “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेला अनुसरुन झाडांची लागवड करण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here