जळगावच्या तरुणाची मुक्ताईनगरला हत्या 

On: July 19, 2024 1:15 PM
crimeduniya

जळगाव : जळगावच्या तरुणाची मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा – कुंड शिवारात हत्या करुन मृतदेह पुर्णा नदीपात्रात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. नितीन साहेबराव पाटील (रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव परिसरात खळबळ माजली आहे. आज 19 जुलैच्या पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे म्हटले जात आहे. 

जवळपास आठ ते नऊ तास पूर्णा नदीपात्रात शोधमोहीम राबवल्यानंतर हत्या झालेल्या तरुणाचा मृतदेह गवसला. या घटनेप्रकरणी दोघा संशयितांनाना ताब्यात घेण्यात आले आहे. मुक्ताईनगर येथील तरुणाने मयत नितीन पाटील यांच्याकडून एक लाख रुपये उधार घेतले होते असे समजते. ही रक्कम नितीन पाटील संबंधित तरुणाकडे मागणी करत होता. ही रक्कम उधार घेणाऱ्या तरुणाच्या मित्राला नितीन पाटील याचा तगादा आवडत नव्हता. एका कार्यक्रमाला जायचे आहे या बहाण्याने नितीन पाटील यास मुक्ताईनगर येथे बोलावून घेतल्यानंतर हा हत्येचा प्रकार झाला असल्याचे म्हटले जात आहे. डोलारखेडा शिवारात नितीन पाटील याचा निर्घृण खून केल्यानंतर त्याचे हातपाय बांधून तो मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment