जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुन्हे आढावा बैठक संपन्न झाली. आजच्या गुन्हे आढावा बैठकीत एकूण 138 अधिकारी – कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेसह इतर सर्व पोलीस अधिकारी कर्मचा-यांनी केलेल्या तपास कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी समाधान व्यक्त केले.
किचकट व न उकलणा-या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय योग्य रीतीने व शिताफीने आपले खबरे तसेच पारंपारिक – तांत्रीक नेटवर्क वापरून योग्य रीतीने तपास केला. यापुढे देखील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशाच पद्धतीने गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी मार्गदर्शन केले.