जळगाव : पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा तांडा येथील विवाहीता आपल्या तिन वर्षाच्या बालिकेसह बेपत्ता झाली आहे. दिपाली आलम चव्हाण असे विवाहितेचे आणि किर्ती आलम असे बेपत्ता मायलेकींची नावे आहेत. या प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली आहे. गेल्या 9 जुलै पासून दोघी मायलेकी बेपत्ता झाल्या आहेत.
आलम इंदल चव्हाण हा तरुण त्याची पत्नी दिपाली व परिवारासह हाडाखेड ता. शिरपूर येथे राहतो. तो दहीवद ता. शिरपूर येथील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करतो. दि. 3 जुलै रोजी आलम चव्हाण त्याच्या पत्नी व मुलांसह आई वडीलांकडे पिंपळकोठा तांडा येथे आला होता. त्यानंतर 6 जुलै रोजी आलम चव्हाण हा त्याची पत्नी दिपाली व मुलांना आईवडीलांकडे पिंपळकोठा तांडा येथे सोडून आपल्या नोकरीच्या ठिकाणी दहिवद येथे एकटाच निघून गेला. त्यानंतर 9 जुलैच्या रात्री एक वाजेच्या सुमारास दिपाली आपल्या मुलीसह बेपत्ता झाली.
आलम चव्हाण याच्या वडीलांनी त्याला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आलम तातडीने पिंपळकोठा तांडा येथे आला. त्याने पारोळा पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार मिसींग दाखल करण्यात आली. पुढील तपास पो.ना. संदिप सातपुते करत आहेत.