दुहेरी हत्याकांडाने जालना जिल्हा हादरला

On: September 2, 2020 7:16 PM

जालना : भरदिवसा एकाच कुटुंबातील मायलेकीच्या हत्येने जालना जिल्हा हादरला आहे. पतीने चारित्र्याचा संशय घेत पत्नी व मुलीची निर्घृण हत्या आज भरदिवसा जालना जिल्हयाच्या परतूर तालुक्यातील आष्टी या गावी झाली.

ज्योती शहाजी देशमुख (27) व ऋतुजा शहाजी देशमुख (7) अशी दोघा मयत मायलेकींची नावे आहेत. आरोपी शहाजी देशमुख यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पती शहाजी देशमुख याने पत्नी आणि मुलीवर धारदार शस्त्रानं सपासप वार केल्याने दोघी मायलेकी जागीच ठार झाल्या.

या घटनेमुळं परतूर तालुक्यातील आष्टी या गावात शोककळा पसरली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच्या संशयातून व त्यातून होणा-या वादातून हे हत्याकांड झाले असल्याची प्राथमिक स्वरुपातील चर्चा आहे. हत्येनंतर पळून जाणा-या शहाजी देशमुख यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आष्टी पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment