जळगाव दि.२८ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या प्रायोजकत्वातून केले होते. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे ही स्पर्धा संपन्न झाली. स्विस लिग पध्दतीने एकुण आठ डावात खेळवली गेलेल्या या स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी अव्वल ठरला त्याला प्रथम क्रमांकाचे १५००० हजाराचे रोख पारितोषिक व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले गेले. खान्देश सेंट्रल येथे झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. राहुल महाजन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, सहसचिव अंकूश रक्ताडे, जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे,मुख्य पंच गौरव रे मुंबई, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे उपस्थित होते.
स्पर्धेत अर्थव सोनी ठाणे याला द्वितीय क्रमांकासाठी रोख रूपये १३,००० व चषक, तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या प्रथमेश शेरला पुणे याला रूपये १०,००० व चषक, तर सौरभ महामने पुणे याला ९००० रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर दहा क्रमांकापर्यंत एकूण ७२,००० हजाराची रोख पारितोषीके देण्यात आली.यात अनुक्रमे ओम नागनाथ लमकाने पुणे योहन बोरीचा मुंबई, ईश्वरी जगदाळे सांगली, राम विशाल परब मुंबई, साई शर्मा नागपूर, अजय परदेशी जळगाव यांचा समावेश होता. यानंतर उत्तेजनार्थ म्हणून अनुक्रमे ७,९,११,१३,१५, वयोगटाखालील सहभागी खेळाडूंना उत्तेजनार्थ पहिल्या तीन खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये ७ वर्ष वयोगटाखालील गटात शिरीष इंगोले बुलढाणा, कबिर श्रीकांत दळवी जळगाव ,शाश्वत शिवाजी देशमुख बुलढाणा, सुंदरसिंग गेहर कौर बुलढाणा यांचा समावेश होता. ९ वर्ष वयोगटाखालील अद्वित अमित अग्रवाल,युवेन गौरव जेव्हरी, आरुष सागर शिंदे, ११ वयोगटाखालील अविरत चव्हाण, आदित्य जोशी,समवेद पासबोला, 13 वर्ष वयोगटाखाली गटात निमे बन्साली, आदित्य चव्हाण, शाश्वत गुप्ता, तर 15 वर्ष वयोगटाखालील गटात हर्ष घाडगे, मानस गायकवाड, मयांग संतोष हेडा यांना विशेष उत्तेजनार्थ चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील पहिल्या चार विजयी खेळाडूंचा ऑगस्ट गुडगाव हरियाणा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली आहे. डाॅ. राहुल महाजन, गौरव रे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या गौरव रे, अभिषेक जाधव, आकाश धनगर, नथ्यू सोमवंशी, प्रविण ठाकरे यांचा ही विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन आणि सचिव नंदलाल गादिया यांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे पदाधिकारी, जैन स्पोर्टस अकॅडमीचे सर्व सहकारी आणि जैन इरिगेशन मधील सहकारी यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले. आभार फारुक शेख यांनी मानले.