मुंबई : विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने राहतील. राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक आहेत. त्याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली होती.
परीक्षा सहज, सोप्या रितीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरुंचे म्हणणे जाणून घ्यावे, समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करावी. त्यानंतर विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याच्या सुचना राज्यपालांनी केल्या असल्याचे उद्य सामंत यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसमोर नेटवर्क आणि संसाधनांच्या विविध समस्या आहेत. त्यावर सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यावर चर्चा सुरू आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यापीठाची राहील असे सामंत यांनी स्पष्ट केले.कोश्यारी सकारात्मक आहेत.