सोन्याचे वर्तमान, भविष्य कधीही फायदेशीर – स्वरुपकुमार लुंकड

जळगाव : भारतासह जगात गेल्या आठवड्यात सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सारखी चढ उतार सुरु आहे. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीही फायदेशीर असते.खरेदी आणि विक्रीत प्रत्येक दुकानदाराला मार्जिन ठेवावे लागते.समजा आज भाव ५१,५०० आहे आणि तुम्ही १०० ग्रॅम सोने विकत घेतले तर त्याचे ५ लाख १५ हजार रुपये होतात. हे सोने जर दोन महिन्यांनी विक्रीला नेले तर ज्वेलर्स प्रॉफिट मार्जिन आणि खरेदी-विक्री मार्जिन ठेवूनच विकत घेत असतो. खऱ्या सोन्यात घट नसते तर त्यात बाइंग-सेलिंग मार्जिन असते. डॉलर आणि रुपये अशा स्वरुपाचा त्यात फरक असतो. ज्वेलर्स आणि डिलर्स हे दोन प्रकार त्यामधे असतात. डिलर्सकडून सोनं घेतल्यानंतर त्याचे भाव वाढत असतात. त्यासाठी एमसीएक्स आणि स्थानिक दरात तफावत आढळून येते. जीएसटी लागल्यामुळे किमतीत फरक पडतो.

सध्या डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. सोन्याच्या किमतीने ४५ हजारांचा टप्पा केव्हाच पार केला आहे. याउलट दुसरीकडे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. दरम्यान लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल वाढला आहे.सोन्याच्या किमती जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. सोन्याच्या किमती ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचे दर हे केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. शंभर वर्षांपूर्वी १९१९ साली लंडनचे पाच बडे बुलियन ट्रेडर्स एकत्र आले होते. त्यांनी सोन्याचे दर निश्चित करण्याची पद्धत सुरु केली. लंडनमध्ये त्या काळात ब्रिटिश राजवट होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे त्या काळातील श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड असा होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती ? त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणामधेच सोन्याची मोजदाद होत असे. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचे दर ग्रॅमच्या स्वरुपात निश्चित करण्यात आला.

आता सोन्याचे दर लंडनमध्ये ठरवले जातात. जगातील १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याच्या किमती निश्चित करतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही निवडक नावे आहेत. त्यातील दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी त्या दोन चिनी बॅंकांची नावे आहेत. सोन्याची किंमत ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनची महत्वाची भुमिका असते. या संघटनेचे सभासद भारतातील बडे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री असे दोन दर त्यामधे असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याची किंमत निश्चित केली जाते. आपल्या बँका परदेशी बँकांकडून सोने खरेदी करतात. त्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागत असतात व ते डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोने सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विक्री करतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय किंमत आणि भारतातील किंमत यांच्यात फरक आढळून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here