पारोळा येथे बॅक मॅनेजर सीबीआयच्या जाळ्यात

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : पीक कर्ज मंजूरीसाठी 75 हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील बॅकेच्या व्यवस्थापकासह पंटरला भोवले. दोघा आरोपींना पुणे सीबीआय पथकाने अटक केली. त्यामुळे बँकींग क्षेत्रात खळबळ माजली आहे. कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची बॅंकेत होणारी लुटालुट या घटनेतून जनतेसमोर आली बॅंक व्यवस्थापक किरण ठाकरे व खाजगी पंटर नरेंद्र गणेश पाटील अशी लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

पारोळा तालुक्यातील तक्रारदार शेतकर्‍याच्या कर्ज मंजुरीसाठी बँक व्यवस्थापक किरण ठाकरे यांनी आठ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. शेतकर्‍याचे कर्ज सात लाख 10 हजार मंजूर झाले होते. लाच देण्यासाठी तक्रारदार शेतकरी बँकेत गेला होता. मात्र आरोपींनी रोकड स्वरुपात लाच न घेता शेतकर्‍याकडून बेअरर चेक घेतला व तो आज गुरुवारी वटवला. त्यातील 25 हजार पंटरने व 50 हजार रुपये मॅनेजरने स्वत: जवळ ठेवून घेतली.

लाचेची पडताळणी बुधवारी पुणे येथे सीबीआयने पुर्ण केली होती. त्यानुसार दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.. गुरुवारी आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता बँक व्यवस्थापकाच्या घरात तब्बल दहा लाखांची रोकड आढळून आली. ती रक्कम जप्त करण्यात आली. सदर कारवाई पुणे सीबीआयचे निरीक्षक आनंद रूहीकर व त्यांच्या पथकाने पुर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here