अडावदला मजुराचा खून उघडकीस 

On: September 2, 2024 11:15 AM

जळगाव : यावल ते चोपडा मार्गावर अंदाजे 45 वर्ष वयाच्या मजुराची हत्या झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले आहे.  हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्यासमोर मोकळ्या जागेवरील पाटचारी परिसरात ही घटना घडली. जगदीश फिरंग्या बारेला सोलंकी असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. 

मयताच्या डोक्यावर व अंगावर गंभीर जखमा व गळ्याभोवती फास आवळल्याची निशाणी आढळून आल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्रीच्या वेळी हा खून केल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस स्टेशनचे स.पो.नि. प्रमोद वाघ, पो.उ.नि. राजू थोरात, भरत नाईक, भूषण चव्हाण, गणेश बोरसे, सागर बागुले, संजय माळी आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई व तपास सुरु केला. घटनास्थळी पोलिसांना एमपी 46 एमएल 6889 या क्रमांकाची मोटारसायकल आढळून आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment