जळगाव : फैजपूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेख्यावरील गुन्हेगार तथा वाळू माफीया ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी (रा. कोळन्हावी ता. यावल) याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भा.द.वि. कायद्या अंतर्गत एकुण नऊ गुन्हे दाखल आहेत.
फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी वाळू माफीया ज्ञानेश्वर तायडे याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता. पोलिस अधिक्षकांमार्फत जिल्हाधिका-यांकडे पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावावर कारवाईचे शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार ज्ञानेश्वर तायडे याची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोउनि. मैनुद्दीन सैय्यद, सहायक फौजदार योगेद्र मालविया, पोहेकॉ योगेश महाजन, पोना समाधान पाटील, पोकॉ. नावकर, पोहेकॉ अनिल पाटील आदींचे याकामी सहकार्य लाभले. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिनस्त पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ रफिक शेख कालु, पोहेकॉ संदिप चव्हाण, पोकॉ. ईश्वर पंडीत पाटील आदींनी या प्रकरणी कामकाज पाहिले.