गावठी कट्टयासह भुसावळला एकास अटक

On: September 10, 2024 7:18 PM

जळगाव : गावठी कट्टा, जिवंत काडतुस आणि स्कॉर्पिओ वाहनासह भुसावळ शहरातून एका जणास अटक करण्यात आली आहे. सुमित मनोहर पवार असे भुसावळ येथील रेल्वे नॉर्थ कॉलनी परिसरातून अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, पो.हे.कॉ. कमलाकर भालचंद्र बागुल, पो.हे.कॉ. गोपाल पोपट गव्हाळे, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.हे.कॉ. संघपाल राजाराम तायडे, पो.ना.कॉ. प्रविण पुंडलीक भालेराव, पो.कॉ. सचिन रमेश पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला पो. हे.कॉ. कमलाकर बागुल यांना या गावठी कट्टयाबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment