“गुड टच – बॅड टच” मार्गदर्शन – जळगाव स्त्रीरोग तज्ञ संघटनेचा नवीन उपक्रम

जळगाव : सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने डॉक्टर्स नेहमीच विविध उपक्रम घेत असतात. नजीकच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या झालेल्या घटना लक्षात घेता, जळगाव स्त्रीरोग तज्ञ संघटना ‘ योग्य व अयोग्य स्पर्श’ , Good Touch Bad Touch’ या विषयावर विविध शाळांमध्ये लहान मुलामुलींना  मार्गदर्शन करणार आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पातील पहिला कार्यक्रम जळगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक १० सप्टेंबर रोजी घेण्यात आला. 

कार्यक्रमादरम्यान प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ वैशाली अतुल चौधरी व डॉ सोनल इंगळे यांनी लहान मुलांना या विषयाबाबत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी काही पालक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनास प्रकल्प प्रमुख डॉ मनीषा दमानी, जळगाव स्त्री रोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ विलास भोळे, मानद सचिव डॉ शीतल भोसले तसेच मुख्याध्यापिका सौ. चारुशीला जगताप, उप मुख्याध्यापिकासौ मृणालिनी पवार  यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here