एक लाखाची लाच – ग्रामविस्तार अधिकाऱ्यांसह कंत्राटी सेवकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची वर्क ऑर्डर काढण्याकामी पंचायत समिती पारोळा येथील कंत्राटी सेवक तथा सहायक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार याने बीडीओ साठी दोन टक्के व स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे सरपंच पुत्रास एक लाख रुपयांची लाच मागितली. या लाच मागणीला ग्राम विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील यांनी प्रोत्साहन दिले. लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार यास जळगाव एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले असून त्याला प्रोत्साहन देणाऱ्या ग्राम विस्तार अधिकारी सुनील पाटील अशा दोघांविरुद्धया पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील सरपंच पुत्र आहे. या गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेव्हर ब्लॉकची प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे चार कामांचे 60 लाख रुपयांची कामे मंजूर होऊन आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी कंत्राटी सेवा तथा कार्यक्रम अधिकारी कल्पेश बेलदार याने तक्रारदारास व्हिडिओ यांचे दोन टक्के व स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे लाचेची मागणी केली. तक्रारदार सरपंच पुत्राने याबाबत दहा सप्टेंबर रोजी जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार दिली होती.

या लाच मागणीच्या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता कल्पेश बेलदार याने तक्रारदार सरपंच पुत्रास तडजोडीअंती एक लाख रुपयांची मागणी करुन ती लाच स्वीकारली. लाच स्वीकारतात कल्पेश बेलदार यास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. कल्पेश बेलदार यांच्यासह त्याला लाच मागणीस प्रोत्साहन देणाऱ्या ग्राम विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील अशा दोघांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोहेकॉ सुनिल वानखेडे, पो. ना . किशोर महाजन, पोना.बाळू मराठे तसेच कारवाई मदत पथकातील पोलिस निरीक्षक नैत्रा जाधव, स्मिता नवघरे, पोहेकॉ,सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here