अमळनेरला महिलेचा खून उघडकीस

On: September 22, 2024 4:19 PM

जळगाव : अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास साधारण 28 ते 30 वर्ष वयाच्या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. शितल जय भोगले असे या मयत महिलेचे नाव असून ती त्याच परिसरातील रहिवासी आहे. 

शीतल जय घोगले ही महिला गांधलीपुरा भागात एका पडीक जागेत डोक्याला मार लागलेल्या मयत अवस्थेत आढळून आली. तिच्या डोक्याला मार लागलेला आणि गळ्यावर आवळल्याचे व्रण दिसून आले. तिच्या हातावर जखमा दिसून आल्याने झटापटी दरम्यान बचाव करताना तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती समजतात पोलीस उप अधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास आणि कारवाईला सुरुवात केली. शवविच्छेदनकामी महिलेचा मृतदेह रुग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment