बुद्धिबळाच्या इतिहासात भारताचा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने साधलेले अपूर्व यश हा भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार समिती सदस्य अशोक भाऊ जैन यांनी दिली आहे. भारतीय खेळाडूंनी दाखवलेले परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे. या विजयामागे केवळ खेळाडूंचा नाही, तर प्रशिक्षक, व्यवस्थापक, संघाचे पदाधिकारी, आणि खेळाच्या प्रत्येक टप्प्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. संघाच्या या संघटित प्रयत्नांमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे.

हा विजय केवळ एका स्पर्धेचा नाही, तर भारतीय बुद्धिबळाच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशाने नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, आणि देशभरात बुद्धिबळ खेळाच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ होईल. या विजयामुळे भारत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एक अग्रगण्य शक्ती बनत आहे, आणि हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

चेस ऑलिंपियाड मधील सर्व सहभागी प्रतिभाशाली खेळाडू अर्जुन एरीगैसी, डी गुकेश,आर प्रगनानन्धा, विदित गुजराथी, हरीकृष्ण पेंटाला व महिला गटातील खेळाडू हरीका द्रोणावल्ली, आर वैशाली, तानिया सचदेव, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनी जागतिक स्तरावर यश प्राप्त केले यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे.या सर्व विजेत्या खेळाडूंचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. चेस ऑलिम्पियाडचे कप्तान म्हणून ग्रैंड मास्टर अभिजीत कुंटे आपले नेतृत्व अद्वितीय आहे. आपल्या मार्गदर्शनात भारतीय टीमने अनेक महत्त्वाच्या यशांचे शिखर गाठले आहे. आपली रणनीती, समर्पण आणि प्रेरणा खेळाडूना नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करते. आपल्या कामगिरीसाठी आपल्याला मनःपूर्वक अभिनंदन!

विशेष म्हणजे चेस ऑलिम्पियाड विजेता  विदित गुजराथी याला शतरंज प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात सहकार्य करण्याची संधी जैन इरिगेशन ला मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे. आज त्याच्या यशस्वी घोडदौडीला पाहून हृदयभरून येतं, आणि त्याच्या प्रगतीने आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. त्याची मेहनत, समर्पण आणि यश खरोखरच प्रेरणादायी आहे.”

आमच्या सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना, आणि संपूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित असून, भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आपल्या संघाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी अशाच उंच भरारीची आणि यशस्वी भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here