रॅगिंग प्रकरणी तिघा विद्यार्थ्यांना क्लिनचिट

Jalgaon civil hospital

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाची चौकशी पुर्ण झाली असून तिघा विद्यार्थ्यांना क्लीन चिट मिळाली आहे. रॅगिंग झाल्याचा प्रकार तक्रारदारांच्या तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील 65 जणांच्या जवाबातून समितीपुढे स्पष्ट झाला नाही. त्यामुळे अँटी रॅगिंग समितीने तिघा विद्यार्थ्यांना क्लीन चिट दिली आहे. पीडित विद्यार्थी रुग्ण सेवा न करता घरी गेल्याचे समजते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागातील आशा, नर्स, वार्डबॉय यांच्यासह सहप्राध्यापक यांचे जबाब या रॅगिंग घटनेप्रकरणी नोंदवण्यात आले. या सर्व जवाबातून रॅगिंग झाल्याचे निष्पन्न झाले नाही. तक्रारदार तसा ठोस पुरावा देऊ शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here