दगडफेकीत महिला फौजदारासह चौघे जखमी

On: October 5, 2024 9:01 AM

जळगाव : लहान मुलांच्या वादाचे पर्यवसान दोन गटातील दगडफेकीत झाल्याची घटना पारोळा येथे गुरुवारी रात्री अकरा  वाजता घडली. या घटनेत महिला फौजदारासह चौघे जखमी झाले. या घटनेप्रकरणी 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बारा जण ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत  महिला फौजदार तिवारी, पो.कॉ. महेश पाटील, होमगार्ड भटू  पाटील व धोंडू लोंढे असे सर्व जण जखमी झाले आहेत.

पारोळा येथे गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास लहान मुलांचा आपसात वाद झाला. या वादाची माहिती मुलांच्या घरी समजल्या नंतर त्यांचे पालकही घटनास्थळी आले. बघता बघता दोन्ही गटात वाद वाढत गेला आणि त्याचे पर्यावसन  दगडफेकीत झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमळनेर, धरणगाव येथून अतिरिक्त पोलिसा कुमक दाखल झाली. एसआरपीच्या दोन तुकड्या पारोळा येथे तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंदोबस्तावरील महिला फौजदार तिवारी यांच्या हात व पायाला फॅक्चर झाले आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment