घरगुती वादातून चौघी जणी झाल्या बेपत्ता — पोलिसांनी शोधून काढला कल्याणचा पत्ता 

जळगाव : घरगुती वादाचा राग आल्याने यावल तालुक्यातील एका तरुणीने तिघा अल्पवयीन मुलींसह रेल्वेने मुंबईची वाट धरली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने बेपत्ता झालेल्या चौघींना  कल्याण रेल्वे स्टेशनवर शोधून त्यांची वाट अडवण्यात आली. यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामगिरीत सहभाग घेतला. 

घरगुती वाद निर्माण झाल्याने संतापाच्या भरात यावल तालुक्यातील 19 वर्षाची एक तरुणी तिघा अल्पवयीन मुलींना सोबत घेत घरातून निघून गेली होती. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान या घटनेने यावल तालुक्यात खळबळ माजली होती.  पोलिसांनी तातडीने तांत्रिक मदत घेत या मुलींना कल्याण रेल्वे स्थानकातुन ताब्यात घेतले.

या चौघींना कल्याण येथून यावल तालुक्यातील त्यांच्या घरी सुखरुप आणण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या पथकातील वसंत बेलदार, हेमंत सांगळे, इस्तियाक सय्यद, मुकेश पाटील, असलम खान, वासुदेव मराठे, मोहन तायडे आदींचा या पथकात समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here