ज्येष्ठ नागरिक सेवादास दलुभाऊंनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि. १३ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होत आहे. निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. आज १३ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर मतदार संघात जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य सेवादास दलिचंद जैन (वय ९४ वर्षे) यांच्या गृहमतदानाने या मोहीमेस आरंभ झाला. 

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने मतदानाचा टक्का वाढवावा त्यादृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाची मोहीम १३ व १४ नोव्हेंबर दरम्यान राबविली जात आहे. मतदारांनी येत्या २० रोजी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असेही आवाहन करण्यात आले. 

*लोकशाही बळकटीसाठी उत्तम पर्याय- दलिचंद जैन* – येत्या २० रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्ध, दिव्यांग यांना मतदान कसे करता येईल याबाबत संभ्रम होता परंतु, निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्तुत्य निर्णयामुळे वयोवृद्ध, दिव्यांग बांधवांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही बाब म्हणजे लोकशाही बळकटीसाठी उचलेले उत्तम पाऊल होय. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो असे दलिचंद जैन म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here