फरार उप निरीक्षकाच्या घरी आढळले चाळीस लाखांचे घबाड

जळगाव : जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई दरम्यान फरार झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फरार उप निरीक्षकाच्या घर झडतीत 40 लाख 98 हजार 44 रुपये किमतीचे घबाड आढळून आले आहे. फैजपूर पोलिस स्टेशनला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप निरीक्षक राजकिरण सोनवणे आणि खासगी इसम किरण माधव सुर्यवंशी या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7(अ) प्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान फरार झालेले उप निरीक्षक राजकिरण सोनवणे हे अद्यापही फरार आहेत.

त्यांच्या भुसावळ येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्यात 1 लाख 49 290 रुपये किमतीच्या देशी विदेशी मद्याच्या विविध ब्रॅंडच्या बाटल्या, 25 लिटर गावठी हातभट्टीची दारु, बुलेट मोटार सायकल, किया सेलटॉस कारचे पेपर्स, तिन तोळे सोन्या चांदीचे दागिने, 9 एम. एम. पिस्टलच्या दहा पुंगळ्या, 1 लाख 91 हजार रुपये रोख रक्कम, 17 लाख 90 हजार रुपये किमतीच्या सोने चांदी खरेदीच्या मुळ  पावत्या याशिवाय टीव्ही, फ्रिज, एसी व इतर  वस्तू आणि बॅंकेचे इतर  कागदपत्र असा  एकुण 40 लाख 98 हजार 44 रुपये किमतीच्या मुद्देमालाचा समावेश आहे. जळगाव लाच  लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचा पुढील तपास पोलिस निरीक्षकस्मिता नवघरे करत आहेत.       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here