आयपीएल 13वे हंगाम सुरू होण्यासाठी 13 दिवस शिल्लक असूनही वेळापत्रक जाहीर झाले नव्हते. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज झाले होते. त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह 11 सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे क्रिकेटच्या स्पर्धा होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली होती.
सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे क्रिकेट रसिकांच्या चिंतेत भर पडली होती. अखेर बीसीसीआयने आज रविवारी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले. 19 सप्टेबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे आयपीएल स्पर्धा होणार आहे.