जळगाव : जळगांव जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा-2024 चा समारोप उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धा दि. 2 ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदानावर आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एल माहेश्वरी यांच्या शुभ हस्ते झाला. बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी व विशेष उपस्थिती किशोर चौधरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते व अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर यांच्या उपस्थितीत पार पाडला.
या क्रिडा स्पर्धेत पोलीस मुख्यालय, जळगांव, भुसावळ, चाळीसगांव, पाचोरा, चोपडा/अमळनेर, फैजपुर/मुक्ताईनगर या विभागातील पुरूष व महीला अशा एकुण 125 खेळाडुंनी भाग घेतला होता. या स्पर्धा अतिशय अटीतटीच्या झाल्या. या वर्षी वैय्यक्तीक खेळामध्ये धावणे,उंच उडी, कुस्ती, गोळा फेक, वेट लिफ्टिंग, भाला फेक, ज्युडो, स्विमिंग, बॉक्सिंग तसेच वैयक्तीक व हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल सारख्या सांघीक क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील खेळाडुंनी अतिशय उत्साहाने भाग घेतल्यामुळे या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या. बक्षीस समारंभात 100 मीटर पुरुष स्पर्धेत पोलीस कॉन्स्टेबल समीर पठाण व 100 मीटर महिला स्पर्धेत महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी कोंडके यांना बेस्ट प्लेअरचे बक्षीस देण्यात आले.