जळगाव : कर्जबाजारी झालेल्या जावयाने आपल्याच सासऱ्याकडे घरफोडी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी ता. भुसावळ) असे या घरफोडया जावयाचे नाव आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी भुसावळ शहरातील शिवशक्ती कॉलनी परिसरात राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घराची मागील लोखंडी खिडकी तोडून घरातील 33 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 2 लाख 60 हजार रुपये रोख असा एकुण 28 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. या घटने प्रकरणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणि सर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाअंती फिर्यादीच्या जावयानेच हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोलिस नाईक सोपान पाटील, पो.कॉ. प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा आदींच्या पथकाने या गुन्हा उघडकीस आणण्याच्या कामगिरीत सहभाग घेतला.