चोरीच्या विस मोटार सायकली हस्तगत

जळगाव : जळगाव शहर आणि जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या वेगवेगळ्या तपासात चोरीच्या एकुण विस मोटार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने एक आणि जिल्हापेठ पोलिस स्टेशन पथकाने 19 अशा चोरीच्या एकुण विस मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या तपासात एकास अटक करण्यात आली आहे. आसिफ बशीर पटेल असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतून एक आणि जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतून अठरा अशा एकुण 19 मोटार सायकली चोरी केल्याचे अटकेतील आसिफ पटेल याने कबुल केले आहे. चोरी केलेल्या मोटार सायकली यावल तालुक्यातील सावखेडा सिम या गावी विकल्याची देखील त्याने कबुली दिली आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे अकरा आणि जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील आसिफ याच्याविरुद्ध यापुर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत.

पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या गुन्हे शोध पथकातील स.पो.नि. रामचंद्र शिकारे, पो.उप.निरीक्षक राजु जाधव, सहायक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ संतोष खवले, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतिश पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, पो.कॉ. अमोल ठाकुर, पांचाळ, प्रणय पवार आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या तपासात 19 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या तपासात आणि कारवाईत एकुण पाच जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले आहे. शाहरुख रहमतुल्ला खाटीक (रा. लक्ष्मी नगर जळगाव), सुरेश उत्तम मोरे (रा. वाघळुद ता. धरणगाव), राजेद्र ज्ञानेश्वर महाजन (रा. धानोरा ता. धरणगाव, ह. मु. कांचन नगर जळगाव), गणेश सुभाष पाथरवट (रा. वाघळुद ता. धरणगाव), अविनाश सुनिल पाथरवट (रा. वाघळुद ता. धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्यांची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील राजेंद्र महाजन याच्याविरुद्ध यापुर्वी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला चोरीचा तर शाहरुख खाटीक याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा एक गुन्हा दाखल आहे.

पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या पथकातील सपोनि संतोष चव्हाण, मपोहेकॉ भारती देशमुख, पोना राजेश पदमर, पोकॉ मिलीद सोनवणे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ अमितकुमार मराठे, पोकॉ. प्रशांत सैदाणे, पोकॉ. नरेंद्र दिवेकर, पोकॉ. प्रविण जाधव, पोकॉ. विकास पहुरकर आदींच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here