जळगाव : जळगाव – भुसावळ दरम्यान असलेल्या महामार्गावरील स्वामीनारायण गुरुकुलचे सचिव स्वामी ऋषी स्वरुपदास यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटने प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून परिसरात खळबळ माजली आहे.
गुरुकुलच्या छताला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात “वाय फाय कनेक्ट, मोबाईल चेक करा” असा मजकूर आढळून आला. भुसावळ तालुका पोलिसांनी त्यांची चिठ्ठी, मोबाईल आणि गळफास घेण्यासाठी वापरलेली दोरी जप्त केली आहे. त्यांच्या सहका-यांनी बराच वेळ आवाज दिल्यानंतर देखील ते खोलीतून बाहेर आले नाही. खिडकी उघडून पाहिल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.