जळगाव : जळगाव शहरातील शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणा-या पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत आज शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांच्या सहका-यांनी तसेच जळगाव शहर मनपा अतिक्रमण विभागाने चौबे शाळा व मनपा शाळा क्रमांक 17 च्या परिसरात ही कारवाई केली. या पान टपरी चालकांविरुद्ध यापूर्वी दंडात्मक कारवाई केली होती. तरीदेखील त्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरुच ठेवली होती. या परिसरातील सहा पान टपऱ्या कायमस्वरूपी हटवून त्या मनपा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या. पुढील दोन दिवसात उर्वरित पान टपरी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी म्हटले आहे.
इकबाल शेख उस्मान शेख रा. इस्लामपुरा, शंकर लिंगा गवळी रा. गवळीवाडा जळगाव, भिका लिंगा गवळी रा. गवळीवाडा जळगाव, गणी मोहमद डिगी रा. भिलपुरा जळगाव तसेच मनपा शाळा क्रमांक 17 परिसरातील प्रकाश नामदेव पाटील रा बळीराम पेठ वअब्दुल करीम शेख इसा रा काट्या फाईल जळगाव यांच्या विरुद्ध आज कारवाई करण्यात आली.
पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी, पोलीस उप निरीक्षक योगेश ढिकले, हेकॉ युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, पोलिस नाइक भागवत शिंदे, पो कॉ विकी इंगळे, पाटील, अनिल कांबळे तसेच जळगाव महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय ठाकूर व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.