जळगाव : पारोळा शहरातील बियर बार फोडून मद्याच्या बाटल्यांची चोरी करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांच्या अभिलेख्यावरील आरोपी शान्या ऊर्फ शांताराम प्रताप कोळी (रा.हातेड ता. चोपडा) असे त्याचे नाव आहे.
दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी पारोळा शहरातील एका बियर बारचे कुलुप तोडून त्यातील महागड्या देशी विदेशी मद्याच्या बाटल्या चोरी झाल्या होत्या. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात रेकॉर्डवरील संशयीत आरोपी शान्या उर्फ शांताराम कोळी यास ताब्यात घेतले असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. संदीप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.