नाशिक : नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय सॉफ्ट टेनिस राष्ट्रीय स्पर्धा देवास, राज्य मध्य प्रदेश येथे संपन्न झाल्या. यात महाराष्ट्राच्या 14, 17 व 19 वर्षातील मुला-मुलींनी दैदिप्यमान कामगिरी करत राज्याला अनुक्रमे सुवर्ण व कांस्य पदक मिळवून दिले.
14 वर्षातील मुलांमध्ये नाशिकचा इस्पेलीयर हेरिटेज स्कूलचा विद्यार्थी चंद्रगुप्त विक्रम देशमाने हा सहभागी झाला होता. त्याला देखील सुवर्णपदक प्राप्त झाले असून नाशिकचा सॉफ्ट टेनिस मधील पहिला सुवर्णपदक विजेता खेळाडू तो ठरला आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्व थरातून कौतुक होत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.सुनंदा पाटील, स्कूलचे संस्थापक सचिन जोशी, संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य वाघ , क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, सेक्रेटरी मुकुंद झनकर, राकेश पाटील सर, सारंग नाईक सर्वेश देशमुख, सागर झनकर आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.