अवैध रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर गणेरी व मानोली येथे महसुल विभागाने पकडले

घाटंजी यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : गुरुवारी 19 डिसेंबर 2024 रोजी  मध्यरात्री घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा गणेरी येथे विनापरवाना अवैध रेती वाहतुक करणारा MH27 X 5380 क्रमांकाचाचा एक ट्रक  अवैध रेती वाहतूक करतांना महसुल विभागाने ताब्यात घेतला. तसेच सदर ट्रक पुढील कारवाई साठी पारवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला. सदर कारवाई मंडळ अधिकारी पि.आर. कांबळे, तलाठी डी. एम. किनाके, तलाठी आर. जी. राठोड, तलाठी रामेश्वर कुमरे या वेळी उपस्थित होते.

दि.१९/१२/२०२४ रोजी  दुपारी घाटंजी चे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल नायब तहसीलदार अरुण भिसे यांनी मौजा मानोली येथे विनापरवाना अवैध रेती वाहतुक करणारे  तिन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करतांना ताब्यात घेतले. तसेच पुढील कारवाई साठी घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले. सदर कारवाई मंडळ अधिकारी आर. जी. शिंदे,  येरकार, तलाठी नवीन खोब्रागडे, अतुल खोब्रागडे, पि. बि. कार, प्रतिक कनाके, पोलीस पाटील शाम वाढई आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here