जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आज दुपारी पंटरच्या मदतीने केलेल्या छापा कारवाईत हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आला. 6 महिला एक ग्राहक आणि हॉटेल व्यवस्थापक असे या छाप्यात आढळून आले. हॉटेल मालक पसार होण्यात यशस्वी झाला.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सागर हॉटेल व लॉज या ठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरु होता. त्याबाबत गुप्त बातमी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ राजेंद्र कांडेकर, मपोहेकॉ सुनंदा तेली, पोकॉ इम्रान बेग, तुषार गिरासे, पोकॉ राहुल घेटे, पोकॉ छगन तायडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला दोन पंच व एक डमी ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. हॉटेल मालक सागर सोनवणे हा पसार होण्यात यशस्वी झाला आहे. पीडित महिलांना वैद्यकीय तपासणी अंतिम आषादीप वस्तीगृहात दाखल करण्यात आले आहे.