जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा या उपनगरातील हुडको परिसरात आज सकाळी पूर्ववैमानस्यातून दोन गटात हल्ला झाला. या घटनेत प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुकेश रमेश शिरसाठ या तरुणाचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात परिचित व नातेवाईकांनी गर्दी केली. निळकंठ सुखदेव शिरसाठ, कोमल निळकंठ शिरसाठ, करण निळकंठ शिरसाठ, ललिता निळकंठ शिरसाठ, मुकेश रमेश शिरसाठ, सनी निळकंठ शिरसाठ या गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले.