जळगाव : जळगाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांना स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर (स्वच्छतादूत) म्हणून जाहीर केले आहे. याबाबत प्रशासकीय ठराव करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. नागरिकांमध्ये सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेविषयी संस्कार रुजवणे हा स्वच्छ भारत अभियानाचा मूळ उद्देश आहे. त्यासाठी देश पातळीवर हा कार्यक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे.
जळगाव शहरातील महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांचे शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे.