सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत बोरेले यांच्या हस्ते उद्घाटन

On: January 25, 2025 4:46 AM

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांच्या हस्ते बजाज स्वर्ण तारण शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
पांढरकवडा शहरात राय व्यापार संकुल, सावरकर चौक, आखाडा येथे दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी दुपारी रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी विधिवत पूजा अर्चा करुण फित कापून उद्घाटन केले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून निखिल राजेश राय, शाखा व्यवस्थापक सागर पाटील बजाज, प्रितेश श्याम बोरेले, राजेश ताराचन्द राय, स्मित झाझरीया, गणेश सिंघानिया, उमेश पंचोली, अजय राय, शुभम केळापुरे आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम नंतर रजनीकान्त बोरेले यांचे बजाज शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

पांढरकवडा येथे सर्व सुविधा आणि सुरक्षाने उपलब्ध आणि विशेष म्हणजे प्रोसेसिंग आणि मुल्यांकन इत्यादी प्रकारचे शुल्क शून्य या तत्वावर अगदी कमी वेळेत स्वर्ण कर्ज गरजु महिला व नागरिकांना मात्र एक प्रतिशत व्याज दराने सहजतेने उपलब्ध होण्या साठी या संकल्पनेतुन बजाज फायनान्स गोल्ड लोनची नवीन शाखा उघडण्यात आली आहे.
बजाज शाखेच्या उद्घाटन समारोह कार्यक्रमात शुभम राउत, रत्नदीप ढवळे, आतिश क्षीरसागर, विशाल मग्गिडवार, अक्षय पीपलवा, पवन व्यास (महाराज), प्रितम नव्हाते, संदीप गेडाम, अनिकेत पारखे, शिवम बोरेले, उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment