जळगाव : चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील चौघांकडून एक गावठ्ठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुस हस्तगत केले आहेत. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
9 फेब्रुवारी रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास हातेड शिवारातील बुधगावच्या दिशेने जाणा-या फाट्यावर चौघे जण गावठी कट्टा घेऊन जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पो.नि कावेरी कमलाकर यांच्या पथकातील पोकॉ रावसाहेब पाटील, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ विठ्ठल पाटील, पोकॉ विशाल पाटील, पोकॉ प्रमोद पारधी आदींनी सापळा रचून ही कामगिरी केली. वैभव शैलेश गायकवाड, सुजल प्रकाश गायकवाड, सौरभ सुनिल जाधव, स्वयं पिंटु राँय अशी अटक करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील चौघांची नावे आहेत.