जळगाव : रोख रकमेसह सोन्याचे दागिने बंद घर फोडून चोरून नेणाऱ्या चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गणेशोत पथकाने शिताफीने अटक केली आहे. रिजवान फकीरा बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
दिनांक 10 फेब्रुवारी रोजी फळ विक्रेते इब्राहिम इस्माईल बागवान यांच्या राहत्या बंद घराचे दुपारच्या वेळी कुलूप तोडून चोरीचा प्रकार झाला होता. घरातील बेडरूम व किचन मधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडुन 1,72,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळून आले होते. त्यात 28 हजार रुपये रोख व 1 लाख 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. या घटने प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव, सहायक फौजदार हसमत अली सैय्यद, पो हे कॉ. विजय बळीराम नेरकर, रमण काशिनाथ सुरळकर, पो. हे. कॉ. महेश एकनाथ चौधरी, पो. कॉ. आवेद हकीम शाह, राहुल विनायक वानखेडे, अमर सुरेश अढाळे, प्रशात रमेश परदेशी आदींच्या पथकाने सापळा रचून चोरट्यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.