रायगड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन आल्याचे प्रकरण अजून ताजेच आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊसची रेकी झाल्याची माहिती समोर आली आहे. खालापूर तालुक्याच्या भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी साडे सात वाजता टुरीस्ट कारने 3 ते 4 जण आले होते. त्यांनी ठाकरे यांच्या फार्म हाऊसची रेकी केली. मुबंई दहशतवाद विरोधी पथकाने नवी मुबंई टोल नाक्यावर आरोपींना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे इम्तियाज नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ती कार मुबंईच्या दिशेने रवाना झाली. प्रसंगावधान राखत फार्म हाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा क्रमांक टिपून घेतला. त्यांनी वाहनाचा क्रमांक तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुबंई पोलिसांना कळवला. या घटनेची दखल घेत मुबंई एटीएसने ही कार नवी मुबंई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. रात्रीपासून या वाहनातील सर्वांची एटीएस कडून कसून चौकशी सुरू आहे.
खालापूरसह भिलवले येथील फार्महाऊस वर पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. दगंल नियत्रंण पथकाचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूर येथे उपस्थित असून एटीएसला तपासकामी सहकार्य करत आहेत.