जळगाव : दोन वेगवेगळ्या कंपनीत घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केल्या आहेत. साई प्रेरणा इंडस्ट्रीज आणी महालक्ष्मी युनी एक्झिम या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.
साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतुन 3 लाख 3 हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या व अँल्युमीनीयमच्या वायरींग, ईलेक्ट्रीक मोटार, हीट कंट्रोलर, पॅनल, लोखंडी पॅनल, लोखंडी बिम रोल, दोन गेअर बॉक्स, ट्रॉन्सफॉर्मर, प्लास्टीक व्हर्जीनच्या दाण्याने भरलेल्या 30 बॅग असा मुद्देमाल चोरी झाला होता. तसेच महालक्ष्मी युनी एक्झीम कंपनीतील 50 हजार रुपये किंमतीचे 2 किलो चांदीचे साहीत्य व 60 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी झाला होता.
या दोन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर मिळालेल्या बातमीच्या आधारे साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणारे संशयीत उमेश उर्फ भावडया संतोष राजपुत (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव), आकाश सुरेश शिंदे (रा. साईनगर कुसुंबा) आणि पृथ्वीराज उर्फ डुब-या बच्चन बागडे यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान त्यांच्या ताब्यातून 1 लाख 11 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्हयाचा तपास पोलिस उप निरिक्षक चंद्रकांत धनके व पो. कॉ. योगेश घुगे करत आहेत.
महालक्ष्मी युनी एक्झीन या कंपनीत चोरी करणारे संशयीत प्रकाश उर्फ गिद्धा काळु राठोड व गोविंदा उर्फ लल्ला देविदास ढालवाले (दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) यांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी त्यांच्या तिघा साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. अटकेतील दोघांनी त्यांच्या हिश्श्यावर आलेल्या 35 हजार रुपयांपैकी 22 हजार रुपये पोलिसांना काढून दिले. इतर फरार आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहे. या गुन्हयाचा तपास पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे व पोना योगेश बारी करत आहेत. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोना योगेश बारी, किशोर पाटील, पोकॉ सिध्देश्वर डापकर, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकुर, योगेश घुगे यांनी केला.