जळगाव : मॅफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीच्या हेतूने बाळगणाऱ्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्फराज जावेद भिस्ती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जळगावच्या शाहूनगर येथील रहिवासी तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख 34 हजार रुपये किमतीचा एमडी हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
जळगाव शहरात अंमली पदार्थ विक्री होत असल्याची ओरड सुरू होती. त्या अनुषंगाने जळगाव शहर पोलीस स्टेशनला एक गोपनीय अर्ज प्राप्त झाला होता. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे यांनी त्या अर्जाची गुप्त पद्धतीने चौकशी व तपास केला. तपासाअंती ही छापा कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अनिल भवारी, निवडणुक नायब तहसिलदार दिगबंर भिकन जाधव, सरकारी पंच तलाठी दिपक बाबूराव मोरे, आणि प्रमोद भिकाजी इंगळे, फॉरेन्सिक तज्ञ आदर्श बाळाजी चव्हाण, वजनकाटा धारक जसराज केवलचंद गेलडा, सपोनि. शितलकुमार नाईक, ग्रेड पीएसआय भरत पाटील, सुनिल पाटील, रणित, पोहवा सतिश पाटील, हेकॉ विजय आनंदा निकुंभ, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, चंद्रकांत सोनावणे, पोकॉ उध्दव सोनवणे, प्रणय पवार, अमोल ठाकूर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.