जळगाव : बुलेट चोरीचा दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना दोन बुलेट चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दोघा बुलेट चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहेत. जावेद शेख चांद (मास्टर कॉलनी जळगाव) आणि अदनान अमजद खान (शाहुनगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोहा चोरट्यांची नावे आहेत.
दोघा चोरट्यांकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, विकास सातदिवे, पोका नितीन ठाकुर, नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास किशोर पाटील करत आहेत.