घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी तालुक्यातील खापरी (नाका) येथे अकरा बैलांच्या मानेला दोरीने बांधून त्यांची निर्दयी वाहतुक केल्याप्रकरणी घाटंजी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती कैलास सुलताने असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

कैलास सुलताने याच्याविरुद्ध पोलिस हवालदार अंकुश बहाळे याच्या फिर्यादीनुसार प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये कलम ११ (१), (घ), (ड), (ज) नुसार घाटंजी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटंजी पोलीसांनी १२ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राहुल खंडागळे पुढील तपास करीत आहे.